Financial Freedom in Marathi : आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी केलेली पैशांची बचत आणि योग्य गुंतवणूक होय.
तुम्ही तुमच्या भविष्यातल्या सगळ्या आवडी निवडी आणि ध्येय पूर्ण करू शकाल आणि जीवनात निवांत राहू शकाल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे आर्थिक स्वतंत्र मिळवणे होय.जर तुम्ही श्रीमंत फॅमिलीमधून नसाल तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली योजना बनवायला हवी आणि Financial Freedom साठी त्या योजनेनुसार तुम्ही काम करायला हवं.
विविध लोकांसाठी Financial Freedom चा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी असू शकतो. काही लोकांसाठी याचा अर्थ EMI भरणे असू शकतो. काही लोकांना असं वाटू शकतं की पैसे मिळवण्यासाठी दररोज काम करण्याची गरज पडली नाही पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे interest, dividends किंवा Business मधील Profit च्या माध्यमातून आलेला पैसा आयुष्यभर पुरेल इतका असतो तेव्हा तुम्हाला Financial Freedom मिळालं असं म्हणता येईल.
तर भविष्यात कमाईची अपेक्षा ठेऊन आपण Financial independence झालो असं बोलता येणार नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे खरं तर Bank Ballance असणं किंव्हा Cash Flow(रोख पैसे) असणं होय. या दोन्ही प्रकारामध्ये लवकर सुरुवात आणि नियोजन करणे खूप जास्त महत्वाचं आहे. नियोजनाशिवाय Financial Freedom मिळवण्याचं स्वप्न स्वप्नच राहू शकत.
आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी Follow कराव्या लागतील
जेव्हा आर्थिक स्वातंत्र्याचा विषय येतो,तेव्हा तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे, तुम्ही आर्थिक स्वतंत्र कसे प्राप्त करू शकता ? तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी वाचा.
1) कर्जातून स्वतःची लवकरात लवकर मुक्तता करा
कर्ज मुक्त असणे हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणतेही कर्ज नसणे हे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याकडे उचललेले पहिले पाऊल आहे. असे म्हणण्यास हरकत नाही. नेहमी कर्ज मुक्त राहण्यासाठी तुम्ही Credit Card च्या अती वापरापासून दूर राहा. शक्य झालं तर Credit Card चा वापरच करू नका. आणि तुमचे सध्या चालू असलेले उर्वरित कर्ज भरण्यासाठी एक मजबूत पोलिसी तयार करा. एकापेक्षा एक असलेले Loans(कर्ज ) Manage करण्यासाठी.
आधी सर्वात जास्त High Intrest Rate असलेल्या देयकारांना त्यांचे EMI देण्यास तुमचा कल असावा. हि सवय तुम्ही वेळेवर दिलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कमी करण्यास, आणि तुम्हाला तुमचे Loans (कर्ज) लवकर भरण्यास मदत करू शकते. म्हणून लवकरात लवकर हि सवय अंगी जोपासा.
2) योजना बनवा
वरती सांगितल्याप्रमाणे नियोजनाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य केवळ स्वप्नच राहील.आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एक क्लिअर आणि स्पष्ट दृष्टिकोन आवश्यक आहे. नियोजानाप्रमाणे वागल्यास तुम्ही तुमच्या Financial Freedom च ध्येय सध्या करू शकाल.
3) लवकरात लवकर इन्व्हेस्ट सुरु करा
इन्वेस्टींग करणे कधीही वाईट सवय नाहीये .खरं तर, तुम्ही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गुंतवणूक करणे चालू करावे . जर तुम्ही अगदी लहान गुंतवणुकीपासून तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात केली तरीही, लॉन्ग टर्म तुम्हाला त्याचा फायदा होईल याची खात्री आहे.
Goal निर्धारित दृष्टीकोनासह लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करणे हे Financial Freedom प्राप्त करण्यासाठी एक महत्वाची Step आहे.तुमची असणारी रिस्क ची सहनशीलता , आणि गुंतवणुकीचे ध्येय आणि टाइमलाईन विचारात घेणारा Long Term Investment प्लॅन तयार करणे गरजेचे आहे.
4) साधं आणि समाधानी जीवन जगा
साधं आयुष्य जगल्यानं तुमचे खर्चे कमी होतील आणि तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतील. जे तुमचं पुढे चांगल्या भविष्यासाठी Save केले जाऊ शकतात .
विचार न करून खर्च केल्याने तुमच्या जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यास तुम्हाला कठीण जाईल .
साधं राहनूमान आणि साधी जीवनशैली तुम्हाला कमावलेला प्रत्येक रुपया वाचविण्यात भविष्यात मदत करेल.
5) तुमच्या विमा-पॉलिसीस तयार करा
आपल्या तरुण वयात आपल्या सगळ्यांनाच विमा-पॉलिसीस असण्याचं महत्त्व कळत नाही. एखादी आयुष्यात झालेली दुर्घटना फक्त त्या व्यक्तीचेच नाही तर त्याच्या किंव्हा तिच्या फॅमिलीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. तुमच्या आयुष्याच्या संरक्षणासाठी, तुम्हाला हेअल्थ इन्शुअरन्स किंव्हा मुदत पॉलिसी काढणे आवश्यक आहे. तरुण वयात कमी वयात जर ह्या विमा-पॉलिसीस तुम्ही काढल्या तर त्याचा फायदा असा आहे कि दर महिन्याला कमीत कमी प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल जे कि जास्त अवघड नाही .
5) स्वतःला आर्थिकदृष्ट्या साक्षर करा
पर्सनल फायनान्स , इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंट याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेता यावेत त्यासाठी स्वतःला
वारंवार योग्यरीत्या शिक्षित करा.
6) एकाधिक उत्पन्नाचे विकल्प तयार करून पहा
आर्थिक स्वातंत्र्यासाठी एकाधिक उत्पन्न कमवण्याच्या मागे लागा , वेवेगळ्या प्रकारे कसे उत्पन्न विकसित होईल ते पहा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा .