How to Become Rich | श्रीमंत कसं बनायचं.

How to Become Rich in Marathi | श्रीमंत कसं बनायचं : मित्रांनो प्रत्येकजण आयुष्यात श्रीमंत बनायचं स्वप्न पाहत असतो. आणि त्यासाठी तो रात्रंदिवस कष्टाने मेहनतही करतो .पण तरीदेखील काही लोक योग्यरीत्या पैसे कमावू शकत नाहीत. आणि श्रीमंत बनू शकत नाहीत .
त्याच एकमेव कारण म्हणजे योग्य पद्धतीने गुंतवणूक न करणे , आणि कमावलेल्या पैशांचा योग्य वापर न करणे.


मित्रांनो योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्याची सवयच तुम्हाला लवकर श्रीमंत बनवू शकते,
पण योग्य पद्धतीने गुंतवणूक म्हणजे काय? आणि ती कशी करायची? ह्याच्यावर आपण थोडं बोलणार आहोत.

तर आपण कधी विचार केला आहे का. श्रीमंत लोक कसे श्रीमंत होतात.
आणि अशा कोणत्या गोष्टी श्रीमंत लोक करतात . जेणेकरून त्यांच्याकडे पैसा खेळता राहतो. आणि ते लखपती व कोट्याधीश होतात.


तर अशाच काही सवयी आणि पद्धती ज्या श्रीमंत लोकांमध्ये असतात त्या, आम्ही तुम्हाला या पोस्टद्वारे सांगणार आहोत.
ज्या सवयी तुम्ही देखील तुमच्या अंगी जोपासून आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊ शकता .

इनकम सोर्स वाढवणे (उत्पन्न कमावण्याचा स्रोत) Income Source :

तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या . श्रीमंत लोकांचे अनेक प्रकारचे इनकमचे सोर्स असतात. श्रीमंत लोक एकाच इनकम सोर्स वर डिपेंड राहत नाहीत. अशाच प्रकारे तुम्हाला देखील तुमचे इनकम सोर्स एकाधिक करावे लागतील जेणेकरून तुम्ही थोडी जास्त कमाई करू शकताल. आणि तुमचे उत्पन्न वाचवू शकाल. तर डबल ट्रिपल इनकम सोर्स असणं, श्रीमंत बनण्यासाठी पहिली STEP आहे.

पैशाने पैशा बनवणे :

आता जस कि आपण वरती बघितलं दुहेरी इनकम सोर्स असल्यामुळे, आपण काही ठराविक रक्कम सेव्ह करू शकतो, किंव्हा वाचवू शकतो. त्याच रकमेचा जर आपण योग्य उपयोग करून तो पैसा कुठे तरी इन्व्हेस्ट केला तर आपण पैशाने पैशा बनवतो असं म्हणायला हरकत नाही.तर श्रीमंत बनण्यासाठी आपण हि दुसरी STEP म्हणू शकतो .

लवकर सुरुवात करणे :

बिझनेस असो किंव्हा गुंतवणूक , जर आपण लवकर सुरुवात केली तर त्याचा आपल्याला भविष्यात खूप फायदा होतो. म्हणून लवकरात लवकर स्टार्ट करणं गरजेचं आहे .

इन्व्हेस्टमेंट (गुंतवणूक) करणे Investment :

मित्रांनो श्रीमंत बनण्यासाठी चौथी STEP ही आहे कि, तुम्ही कमावलेल्या पैशांची किंव्हा सेव्हिंग केलेल्या पैशांची कुठेतरी गुंतवणूक करणे होय. मग ती गुंतवणूक शेर मार्केट मध्ये करा , सोन , चांदी , दागिने इत्यादी मध्ये करा किंव्हा रिअल इस्टेट मध्ये करा. तर ह्या इन्वेस्ट्मेन्ट्स मुळे तुम्हाला श्रीमंत बनण्यास मदत होईल.