How to Learn Trading in Marathi : मित्रांनो मला आशा आहे की आत्तापर्यंत तुम्ही शेअर मार्केटबद्दल बरीच माहिती जाणून घेतली असेल . आणि आपल्या मागील पोस्ट मध्ये देखील आपण शेअर मार्केट म्हणजे काय ? ते पाहिलं . आता आपण ट्रेडिंग म्हणजे काय? आणि ट्रेडिंग अकाउंटचे शेअर मार्केट मध्ये काय महत्व आहे ते पाहणार आहोत .
आज ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रेडिंग म्हणजे काय, ट्रेडिंग काय असते आणि ट्रेडिंग कशी शिकायची (How to Learn Trading in Marathi) आणि ट्रेडिंग शिकायला किती वेळ लागू शकतो. हे मी तुम्हाला सांगणार आहे
तसेच त्याचे फायदे आणि तोटे. ट्रेडिंग शिकायला कोणता कोर्स करावा लागतो का ? किंव्हा तुम्ही फ्री मध्ये ट्रेडिंग Online कशाप्रकारे शिकू शकता ? याबद्दल आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहे .
आज मी तुम्हाला सांगणार आहे. की सुरुवातीला नवीन लोक ज्यांना ट्रेडिंग शिकायची असते. ते लोक शिकायला कसे स्टार्ट करतात आणि कशाप्रकारे शिकतात . जर तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचली तर मी खात्रीपूर्ण सांगतो की ट्रेडिंग शिकण्यासाठी काय काय करावं लागत या विषयी तुम्हाला इतर कुठे ठिकाणी शोधत बसण्याची गरज लागणार नाही . तर सर्वात अगोदर बघुयात की :-
1) ट्रेडिंग म्हणजे काय असतं आणि नवीन लोकांनी ट्रेडिंग कशी शिकावी?
ट्रेडिंग म्हणजे काय असतं : ट्रेडिंग ला आपण मराठी भाषेत व्यापार असे बोलतो . पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग ह्या शब्दाला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे . कारण ट्रेडिंग या एकाच शब्दाने शेअर मार्केटचे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. ज्याप्रमाणे किराणावाले, दुकानदार काही ठराविक किमतीत त्यांच्या लागणाऱ्या वस्तू विकत घेतात, आणि त्या नंतर दुकानात आल्यानंतर त्यापेक्षा जास्त किमतीने ते ग्राहकांना विकतात.
यालाच आपल्या मराठी भाषेत व्यवहार असे म्हणतात . पण याउलट आपल्या मराठीत शेअर मार्केटच्या भाषेत आपण याला ट्रेडिंग असे म्हणतो .म्हणजे ट्रेड घ्यायचे आणि नफ्यासाठी ते विकायचे या सर्व प्रक्रियेला आपण मराठी मध्ये ट्रेडिंग असे म्हणतो.
नवीन लोकांनी ट्रेडिंग कशी शिकावी : ट्रेडिंग शिकण्यासाठी टेक्निकल एनालिसिस(Technical Analysis) काय असतं ते कसं काम करत ते शिकाव, कैंडल स्टिक(Candlestick Patterns) आणि चार्ट स्टिक(Chart Patterns) हे कसे काम करतात. याच्याबद्दल शिकणे गरजेचे आहे.
याच्या वेतरीक्त ऑप्शन चैन(Option Chain) कशी वाचायला शिकायची, मूविंग एवरेज(Moving Average), वॉल्यूम(Volume), टेक्निकल इंडिकेटर(Technical Indicator) ट्रेडिंग करताना हे कसे लावतात ते शिका. ट्रेडिंगवर आधारित असलेली पुस्तके वाचून , ब्लॉग्स वाचून किंव्हा Online व्हिडिओस बघून सुद्धा तुम्ही ट्रेडिंग चांगल्या प्रकारे शिकू शकता.
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग चा अर्थ शेअर्सना खरेदी करणे आणि विकणे असा होतो . परंतु त्याच्या वेतरिक्त देखील अनेकप्रकारच्या ट्रेडींग्स शेअर मार्केटमध्ये केल्या जातात . त्यांना आपण Intraday Trading(इंट्राडे ट्रेडिंग), Option Trading(ऑप्शन ट्रेडिंग), आणि Swing Trading(स्विंग ट्रेडिंग) असे म्हणतो .
सुरुवातीच्या काळात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमावणे हा खुप लोकांचा हेतू असतो , जर तुम्हाला ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला देखील ट्रेडिंग शिकावी लागेल . कारण की जे लोक न शिकता Live Market मध्ये Trade करतात, पैसे लावतात . त्यामधील 99% टक्के लोकं नुकसानच करून घेतात.
जर ट्रेडिंगसाठी सगळ्यात बेसिक गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे सगळ्यात आगोदर एक Demat
किंव्हा Trading Account असणे गरजेचे आहे . ज्याच्याद्वारे आपण घरी बसून Online Trading करू शकतो .
- Free मध्ये Demat Account(डिमॅट अकाउंट) Open करण्यासाठी हि पोस्ट वाचा :
आता पुढे आपण ट्रेडिंग कशी शिकायची याची Step By Step Process बघणार आहोत
1) Trading मध्ये बेसिक फंडामेंटल्स काय असतात ते समजून घ्या .
ट्रेडिंग शिकण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला ट्रेडिंग चे बेसिक फंडामेंटल्स काय असतात ते समजून घ्यावे लागतील ज्याच्यावर सुरुवातीच्या काळात इतर लोक लक्ष देत नाही आणि शेअर मार्केट मध्ये LOSS करून बसतात
ट्रेडिंगचे काही नियम असतात जे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावे लागतील :-
- कधीच तुमचे पूर्ण पैसे लावून किंव्हा लोण घेऊन ट्रेडिंग करू नका.
- इतरांच्या Tips आणि Calls च्या भरवशावर Trade करण्याच्या ऐवजी स्वतःच्या ॲनालिसिस वर विश्वास ठेवा.
- कोणत्याही Share ला वाढतोय म्हणून खरेदी करू नका. तर तो Share का वाढतोय ते बघा.
- कोणताही Share खरेदी करण्याअगोदर त्याच पूर्ण टेक्निकल ॲनालिसिस करा.
- स्वस्त Share बघून खरेदी करून नका. कारण अशा प्रकारच्या कंपन्या अधिकतर Loss मध्ये गेलेल्या असत्यात.
- तुम्हाला कोणत्या Price वर Trade मध्ये Entry घेयची आहे आणि कधी Exit घेयची आहे हे लक्षात घ्या.
- ट्रेडिंग करताना तुम्हाला तुमच्या इमोशन्स वर कंट्रोल करावं लागेल , कारण ट्रेडिंग मध्ये तुमचे खरे पैसे लागलेले असतात आणि ज्याची Value प्रत्येकवेळी वाढत असते
जर तुम्ही वरती दिलेल्या ट्रेडिंग च्या बेसिक नियमांचे पालन केले , तरच तुम्ही ट्रेडिंग मध्ये Profit कमावू शकता, नाहीतर असे खूप जास्त लोक आहेत ते आजून समजले नाहीत कि trading एक रिअल बिझनेस आहे कि नाही
काही लोक तर trading ला लवकर पैसे कमवण्याची मशीन समजतात. आणि त्या भानगडीत विचार न करता त्यांनी कष्टानी कमावलेला पैसा लावतात. आणि नंतर लॉस करून बसतात .
होऊ शकत कि सुरुवातीच्या काळात त्तुम्ही प्रॉफिट कमावताल. पण लॉन्ग टर्म मध्ये तुम्ही न शिकता ट्रेडींग ने कधीच प्रॉफिट कमावू शकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग शिकावीच लागेल.
मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्चीतो कि ट्रेडिंग ने पैसे कमवण्याचा कोणताही SHORTCUT उपलब्ध नाही आहे . त्याच्यासाठी तुम्हाला MARKET मध्ये वेळ घालवावाच लागेल. आणि आजपर्यंत जितक्या पण लोकांनी ट्रेडिंग मधून चांगला पैसा कमावला आहे , त्या सगळ्यांनी Trading च्या Basics गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून त्या गोष्टींना Follow केलं आहे .
- ट्रेडिंग म्हणजे काय ? ( संपूर्ण माहिती )
- ट्रेडिंग कशाप्रकारे करतात ? ( )
- ट्रेडिंग करून पैसे कसे कमवावे ? ( अनेक पद्धती )
NEXT STEP 2.
2) Trading मध्ये टेक्निकल ॲनालिसिस कशी करायची ते शिका .
ट्रेडिंग करायची आहे तर, कोणत्याही परिस्थितीत Technical Analysis शिकावीच लागेल. कारण Technical Research च एक असं माध्यम आहे . ज्यामुळे तुम्ही दररोज बाजारात ट्रेडिंग करून लाखो रुपये देखील कमावू शकता . हो आणि हे खरं आहे कारण खुप सारे ट्रेडर्स सध्या कमावत आहेत.
Technical Analysis मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात जसे कि :-
- यामध्ये तुम्हाला चार्ट्स पॅटर्न्सना बघता आणि वाचता आलं पाहिजे .
- कॅण्डलस्टिक काय आहे आणि किती प्रकारच्या असतात याची माहिती असायला हवी .
- सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय असतात आणि चार्ट वर एन्ड कसा बघतात .
- स्टॉपलॉस आणि टार्गेटप्राईज कशी सेट करायची हे समजून घ्यावं लागेल .
- टेक्निकल इंडिकेटर्स च्या बद्दल शिकावं लागेल , आणि त्याचा उपयोग करून शेअरप्राईज च्या मूव्हमेंट्स चा शोध लावणं, शिकावं लागेल .
- याच्यात तुम्हाला समजेल कि Price Action काय असत , आणि शेअर ची किंमत कशी वाढती आणि कमी होती .
- यासाऱ्या वेतरिक्त स्टॉक चा मूव्हमेंट् आणि वोल्युम चेक करावा लागतो .
ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्हाला, वरती दिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे . आणि त्या गोष्टी टेक्निकल ॲनालिसिसचाच एक भाग आहे .
या पोस्टमध्ये पुढे आपण सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेणार आहोत. तरी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस काय आहे? , आणि ते कस करतात, ट्रेडिंग मध्ये याच काय महत्व आहे, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही हि दिलेली पोस्ट नक्की वाचा :- Technical Analysis in Marathi
NEXT STEP 3.
3) Trading मध्ये कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न कशा वाचायच्या ते शिका .
ट्रेडिंग शिकण्याची तिसरी पायरी आहे . ती म्हणजे कॅण्डलस्टिक चार्ट पॅटर्न च्या बद्दल शिकणे . शेअर बझार मध्ये लाल आणि हिरवी अशा दोन प्रकारच्या कॅण्डल्स असतात , ज्या कि कोणत्याही स्टॉक ची प्राईझ कशाप्रकारे कमी आणि जास्त झाली, याच्याबद्दल पूर्ण माहिती देतात .
हिरवी कॅण्डल ला Bullish म्हणतात आणि लाल कॅण्डल ला Bearish म्हणतात .
म्हणजे Green Candle प्राईझ वरती जाण्याचा Signal देती , जेव्हाकी
Red Candle प्राईझ खाली जाणार आहे ते सांगते म्हणजेच Signal देते .
कॅण्डल लाच आपण कॅन्डलस्टिक असे म्हणतो , कारण कि हि स्टिक, काठी च्या आकारासारखी असते .
एक Candlestick BODY आणि WICK ह्या दोन गोष्टी मिळून बनलेली असते .
आणि ती STICK आपल्याला STOCK च्या चार(4) प्राइझ बद्दल सांगत असतात .
- Open ( ओपनिंग प्राईझ जिथून कॅण्डल बनायला स्टार्ट होते )
- Close ( क्लोझिंग प्राईझ जिथे कॅण्डल तयार होऊन संपते )
- High ( निश्चित टाइमफ्रेम च्या वेळेस HIGHEST PRICE होती )
- Low ( निश्चित टाइमफ्रेम च्या वेळेस LOWEST PRICE होती )
तुम्ही जो TimeFrame निवडाल { 5 मिनिटंचा } , { 15 मिनिटंचा }, { 1 तासचा }, { 1 दिवसचा } त्याच TimeFrame ची सगळी कॅण्डल्स तुम्हाला चार्ट वर दिसाय लागतील .
म्हणजेच जर तुम्ही BANKNIFTY चा, ५ मिनिटांचा चार्ट ओपन केला आहे. तर तुम्हाला त्या चार्टवर दिसणारी प्रत्येक कॅन्डलस्टिक ५ मिनिटांच्या TimeFrame मध्ये बनलेली असेल .
NIFTY, BANKNIFTY, Reliance, TCS, HDFC Bank , ICICI Bank किंव्हा कोणत्याही STOCK चा चार्ट बघण्यासाठी इथे क्लिक करा > tradingview या वेबसाईट वर जाऊन तुम्ही चार्ट्स बघू शकता .
ट्रेडिंग करताना तुम्हाला चार्टवर खुप प्रकारच्या कॅण्डल्स दिसतात जसे कि –
- एखाद्या कॅण्डल ची बॉडी खूप छोटी किंव्हा खूप मोठी असू शकते .
- एखाद्या कॅण्डल ची wick म्हणजेच shadow खूपच छोटी किंव्हा खूप मोठी असू शकते .
- एखाद्या कॅण्डल ची बॉडी मध्यभागी बनते , तर एखाद्या कॅण्डल ची खाली , तर एखाद्या कॅण्डल ची वरती
- किंव्हा एखाद्या कॅण्डल ची बॉडी बनतच नाही
- अशाच प्रकारे एकदम ह्याच्या Oposite कोणत्यातरी एखाद्या कॅण्डल ची Shadow , खूप मोठी , तर कोणत्या कॅण्डल ची अगदी नाही च्या बरोबर बनते .
या सगळ्यांबद्दल माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला, कॅन्डलस्टिक च्या प्रकारांच्या बाबतीत वाचावं लागेल किंव्हा इन डेप्थ त्याचा अभ्यास करावा लागेल . ज्याच्या मध्ये वेगवेगळ्या कॅण्डल्स जश्या कि – हॅमर , हँगिंग मॅन, ड्रॅगनफ्लाई, मारुबोझो, ग्रेवस्टोन डोजी, ( हे सगळे जपानी नवे आहेत ) इत्यादी कॅण्डल्स च्या बद्दल सांगितले जाते .
वेगवेगळ्या प्रकाराच्या कॅन्डलस्टिक मिळूनच कॅन्डलस्टिकपॅटर्न बनतात. ट्रेडिंग करताना तुम्हाला चार्ट्स वर दररोज किंव्हा असं म्हणू शकता कि प्रत्येक वेळेला कोणता ना कोणता पॅटर्न नक्कीच दिसतो ज्याला बघून तुम्ही ट्रेड घेऊ शकता . आणि त्यांच्याद्वारे प्रॉफिट पण कमावू शकता .
कॅन्डलस्टिक पॅटर्न च्या बाबतीत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला हि पोस्ट वाचावी लागेल जेणेकरून तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न च्या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल > Candalstick Patterns
एवढाच नाही तर, कॅन्डलस्टिक पॅटर्न ला शिकून तुम्ही कसे दिवसाचे हजारो रुपये कमावू शकता . त्याच्यासाठी तुम्ही मार्केट मध्ये मिळणाऱ्या बऱ्याच पुस्तानमधून माहिती घेउ शकता . अशी भरपूर पुस्तके बझारात उपलब्ध आहेत .
NEXT STEP 4.
4) Trading मध्ये ऑप्शन चेन ॲनालिसिस करून Trading कशी करायची ते शिका .
ट्रेडिंग शिकण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे , ऑप्शन चैन वाचणे आणि ॲनालाईझ करणे, ऑप्शन चैन बघून आपल्याला समजते की –
- सध्या शेअर मार्केटचा ट्रेण्ड कोणत्या दिशेला आहे.
- मार्केटमध्ये वोल्युम किती आहे, म्हणजेच BUYERS आणि SELLERS ची संख्या किती जास्त आहे ज्याला बघून तुम्ही मोमेंटम चा अंदाज लावू शकता.
- मार्केटच्या महत्वाच्या SUPPORTS आणि RESISTANCE चा पत्ता लावला जाऊ शकतो.
- एकाच ठिकाणी पूर्ण डेटा तुम्ही पाहू शकता .
- मार्केट कधी,केव्हा वरती आणि खाली जाऊ शकत .
- आज मार्केटमध्ये BUYERS जास्त आहे की SELLERS , आणि त्याच्याच आधारावर तुम्ही ट्रेडिंग स्ट्रेटजी बनवू शकता.
यागोष्टीने फरक नाही पडत की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय की इंट्राडे ट्रेडिंग ( ज्यामध्ये शेअर ला एकाच दिवसात खरेदी करून विकायचे असते ) म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये तुम्ही ऑप्शन चैन डेटा चा वापर करू शकता .
आता प्रश्न असा येतो की , नेमकं आपण ऑप्शन चैन कशी बघायची , ऑप्शन चैन डेटा ला कशाप्रकारे समजून घेयच आणि ॲनालाईझ करायचं . तर हे सगळं डिटेल्स मध्ये जाणून आणि शिकून घेयच असेल तर ही पोस्ट तुम्ही नक्की वाचायला हवी – ऑप्शन चैन बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर .
मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की , तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये अगदी नवीन आहात तर असं होऊ शकत की ऑप्शन चैन डेटा बघून तुम्हाला पहिल्यांदा काहीच समजलं नाही . कारण की मी पण जेव्हा NSC च्या वेबसाइट वर जाऊन Option Chain बघितली , तर इतका सारा डेटा एकत्र पाहून घाबरलो होतो कारण की , एवढं सगळं कधी समजणार , पण विश्वास ठेवा हळू-हळू शिकत-शिकत आणि प्रॅक्टिस करून करून नंतर सगळं सोप्प वाटाय लागलं आणि तुम्हाला पण वाटेल.
NEXT STEP 5.
5) ट्रेडिंग सायकॉलॉजि याबद्दल अधिकाधिक शिका
ट्रेडिंग शिकण्याची पुढची म्हणजेच पाचवी पायरी आहे , ट्रेडिंग सायकॉलॉजि शिकणे. या STEP मध्ये आपल्याला फक्त इतकच समजून घेयच आहे कि लोक ट्रेडिंग करताना नक्की कसे Behave करतात .
म्हणजेच काही लोक LOAN घेऊन, किंव्हा मित्रांकडून पैसे उसने घेऊन ट्रेडिंग करतात. आणि मग LOSS करून बसतात.
जेव्हा कि काही समजदार लोक, आपल्या पैशांचा छोटासा हिस्साच ट्रेडिंग मध्ये लावतात . जेणेकरून ते बिनधास्थ, आरामशीर ट्रेडिंग करून प्रॉफिट कमावतात .
- मार्केट मध्ये २ प्रकारचे ट्रेडर्स असतात एक Safe traders जे आपल्या पैशांचा वेवस्थित उपयोग करून ट्रेडिंग करतात आणि दुसरे Risky traders जे जास्त रिस्क घेऊन कमी वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी Trade करतात .
- हे दोन्ही ट्रेडर्स वेगवेगळ्या ट्रेडिंग स्ट्रेटेजी चा उपयोग करून पैसे कमावतात .
पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना RISK MANAGMENT लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे . कारण सायकॉलॉजि ठीक नाही होण्याच्या कारणामुळे , खूप लोक आपल्या इमोशन्स वर कंट्रोल नाही करू शकत आणि मार्केट मध्ये आपले बरेचसे LOSESS करून बसतात .
असे कधीच नाही होणार कि तुम्ही ट्रेडिंग मध्ये नेहमी PROFIT च कमावताल. खूप वेळा तुमचे नुकसान देखील
होतील. महत्वाचं हे आहे कि तुम्ही तुमचे PROFIT आणि LOSEES कसे MANAGE करता .
- समजा कि तुम्ही १० वेळा TRADE केला आणि त्यातले ७ वेळेस तुम्ही PROFIT कमावले . तर तुम्ही एक यशश्वी ट्रेडर CATEGORY मध्ये येताल.
- पण जर तुम्ही १० Trade मधील फक्त २ वेळेसच PROFIT कमावत आहात . तर तुम्हाला आजून प्रॅक्टिस ची गरज आहे .
आणि असं पण नाही झालं पाहिजे जस कि तुम्ही टोटल १० TRADE घेतले त्यामधील ७ वेळेस PROFIT कमावले आणि ३ वेळेस झालेले नुकसान हे त्या ७ वेळेस झालेल्या Profit पेक्षा जास्त असेल . तर मग ते ७ वेळेस झालेलं Profit काही कामाचं नसेल . तर
म्हणण्याचे तात्पर्य हेच आहे की तुम्ही ट्रेडिंग करताना तुमचा Risk Reward Ratio मेंटेन केला पाहिजे.
म्हणून प्रत्येक Trade तुम्ही Same Amount नेच करण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो नेहमी Balanced राहील.
तुम्हाला तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजि डेवलप करण्यासाठी, ट्रेडिंग शिकून प्रॉफिट कमवण्यासाठी, आणि ट्रेडिंग चा रिअल Experiance घेण्यासाठी पुढचा Point नक्की वाचायला हवा . जो की आहे –
NEXT STEP 6.
6) पेपर ट्रेडिंग करून Trading ची प्रॅक्टिस करणे.
सुरुवातीच्या काळात Trading शिकण्यासाठी Paper Trading किंव्हा Virtual Trading सगळ्यात सोप्पी आणि सुरक्षित अशी पद्दत समजली जाते . Paper Trading चा अर्थ होतो आपले खरे पैसे न लावता रिअल मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे . म्हणजे तुम्हाला तुमचे खरे पैसे न लावता रिअल मार्केटचा एक्सपेरिअन्स करायला भेटतो .
आजकाल मार्केटमध्ये बरीचशी अशी Virtual Trading चे मोबाईल अँप्स आणि वेबसाइट्स आहेत , ज्याच्यावर जाऊन तुम्ही पेपर ट्रेडिंग ची प्रॅक्टिस करू शकता . जसे कि मोनीभाई(MONEYBHAI जे शेअर मार्केट ची नामांकित वेबसाईट मोनीकंट्रोलचाच एक प्लॅटफॉर्म आहे , जो कि तुम्हाला तुमचे पैसे न लावता Free मध्ये Virtual Trading करण्याची Service देतात .
या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला Trade करण्यासाठी वर्चुअल मनी दिला जातो , आणि त्याद्वारे तुम्ही Real , Live मार्केट मध्ये Trade करू शकता. ह्याचा फायदा हा होतो कि तुमचा स्वतःचा पैसे नाही लागत आणि तुम्हाला Real Market चा अनुभव देखील मिळून जातो .
Paper Trading करता करता तुम्हाला लक्षात येईल की आता तुमची ट्रेडिंग स्किल्स मजबूत होत आहेत . आणि मग नंतर तुम्ही तुमच्या Real Demat Account च्या साहाय्याने Trading करण्यास सुरुवात करू शकता .
NEXT STEP 7.
7) चांगले स्टॉक निवडायला शिका .
Online Trading करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक चांगला STOCK निवडावा लागेल, कारण कि तुम्ही Trade करण्यासाठी जर शुकीचा Stock निवडला तर फक्त एकच Trade तुमचं संपूर्ण प्रॉफिट खाऊ शकतो.
आणि मग आता प्रश्न हा येतो की कोणताही STOCK निवडण्याच्या आगोदर त्या STOCK मध्ये काय काय पाहावे.
- तुम्ही कोणत्या शेअर मध्ये Trading करणार आहात. त्याचा सगळ्यात अगोदर SUPPORT आणि RESISTANCE काय आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे .
- SUPPORT LEVEL ती असते जिथून STOCK ची PRICE वाढायला सुरुवात होते, आणि RESISTANCE LEVEL ती असते जिथून STOCK ची PRICE खाली पडायला सुरुवात होते.
- सपोर्ट आणि रेसिस्टन्स प्राईझ माहिती करून घेतल्यानंतर त्याच्यावर एक ट्रेंडलाइन मारायला हवी. ज्यामुळे दोन्ही प्राईझ मध्ये एक रेंज बनेल.
- आता तुम्हाला STOCK ची Entry आणि Exit Points माहिती करून घेयची आहे. म्हणजेच शेअर मध्ये कधी Entry आणि Exit करायची आहे.
- तर शेअर SUPPORT प्राईझला Touch करून वरच्या साइड ला जायला लागल्यानंतर तुम्हाला शेअर मध्ये Entry घेयची आहे. आणि Resistance वर पोहचल्यानंतर लगेच Exit करायची आहे .
आता आपण याच्यावर बोललो की , Trade करताना एक स्टॉक च काय काय बघायला हवं. पण याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचं तुम्हाला समजून घेयचा आहे की , त्या STOCK मध्ये TRADING करताना आपल्याला कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंग स्टाइलने ट्रेडिंग करायला हवी.
NEXT STEP 8.
8) सुरुवातीला एक Trading Style निवडा .
जर मला कोणी विचारलं की Online Trading कशी शिकायची. तर मी त्याला सांगेल की तुमची एक Trading Style निवडा. आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की , शेअर मार्केट मध्ये प्रत्येक ट्रेडर ची स्वतःची एक वेगळी Trading Style असते . जी वर्षानुवर्षेच्या अनुभवानंतर येते.
- Market मध्ये कोणी सेफली Trading करायला पसंद करत , तर कोणी अग्रेसिव्ह Trading करायला पसंद करत .
- एक Side ला कोणी कमी पैसे लावून जास्त Returns कमावू इच्छितो (ज्यामध्ये RISK जास्त असतो) तर दुसरीकडे कोणी जास्त पैसे लावून पण कमी Returns मिळवून संतुष्ट असतो (कारण यामध्ये खूप कमी RISK असतो).
त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची Trading Style निवडावी लागेल . की तुम्ही ट्रेडिंग ला कोणत्या दृष्टीकोनातून बघता.
तुम्हाला मी अगोदरच सावध करू इच्छितो की इतर लोकांप्रमाणेच तुम्ही देखील TRADING ला पैसे Double करण्याची मशीन समजत असाल. तर तुमचे पण तेच हाल होतील . जे 90 % ट्रेडर्स चे होतात म्हणजेच लॉस . परंतु , जर तुम्ही 10% ट्रेडर्स प्रमाणे Trading ला एक खराखुरा Real Business समजून Trading कराल. तर तुम्हाला LONG TERM मध्ये SUCCESS मिळवण्यापासून कोणी नाही थांबवू शकत.
NEXT STEP 9.
9) ग्लोबल मार्केट ॲनालाईझ करायला शिका .
शेअर मार्केटमध्ये Trading शिकण्यासाठी Global Market च ॲनालिसिस करता येणं गरजेचं आहे, ह्याच कारण असं की जगभरचे शेअर मार्केट एकमेकांशी कनेक्टेड आहेत. याचा अर्थ असा की जर Global Market मध्ये काडी Negative News आली तर त्याचा परिणाम Indian शेअर मार्केट आणि इतर देशांच्या मार्केटवर देखील होतो . ग्लोबल मार्केट ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला दररोज SGX Nifty म्हणजेच सिंगापूर Nifty बघायला हवं . कारण तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज मिळतो की India चा Nifty आज वर जाईल की खाली.
असं 70-75 % पेक्षा पण जास्त वेळा बघण्यात आलं आहे की, Indian चा Nifty पण त्याच दिशेने चालतो , ज्या दिशेने सिंगापूर चा Nifty चालतो .
SGX Nifty नंतर तुम्हाला Dow Jones आणि Nasdaq वर देखील नजर ठेवणं गरजेचं आहे , हे ऊस Stock Market चे Index आहेत जे America च्या शेअर मार्केटचे हाल-चाल विचारतात.
याच्या वेतरिक्त इतर देशांच्या शेअर मार्केटवर देखील तुम्ही नजर ठेऊ शकता . याच्याने तुम्हाला एक अंदाझा मिळून जाईल की , उद्या आपला Indian Share Market कोणत्या दशेला ( वर की खाली ) जाणार आहे . आणि त्याच दिशेला आपण Trade करण्याचा प्लॅन करू शकतो.
- वाचा आणि जाणून घ्या SGX Nifty काय आहे आणि ह्याचा Indian Share Market वर काय प्रभाव पडतो.
- जाणून घ्या American Share Market कधी चालू होत.
NEXT STEP 10.
10) तुमच्या आवडीचा Trading चा प्रकार निवडा.
Trading कशी शिकायची ह्याचा पुढचा टप्पा आहे की, Trading चा प्रकार निवडणे, सुरुवातीच्या काळात लोक ही चुकी करतात की ते कोणत्याही प्रकारची Trading करायला लागतात . जेव्हा की तुम्हाला कोणत्यातरी एकाच प्रकारच्या Trading वर कॉन्सन्ट्रेटे करावं लागेल. तसे ट्रेडिंग चे खूप प्रकार आहेत, पण ही 3 प्रकारांची ट्रेडिंग सगळ्यात जास्त केल्या जातात :-
1) Intraday Trading (इंट्राडे ट्रेडिंग) 2) Option Trading (ऑप्शन ट्रेडिंग) 2) Swing Trading (स्विंग ट्रेडिंग)
1. दररोज पैसे कमवण्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग शिका.
ती ट्रेडिंग ज्यामध्ये एकाच दिवसाच्या आत शेअर्सना खरेदी करावं किंव्हा विकावं लागत, त्याला आपण Intraday Trading म्हणतो , ही ट्रेडिंग थोडी Risky Typed ट्रेडिंग मानली जाते, पण तुम्ही याच्यामध्ये रोज Profit कमावू शकता .
2. लवकर पैसे कमावण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग शिका.
आजकाल सगळ्यात जास्त Popular होत आहे त्या ट्रेडिंग च नाव आहे Option Trading (ऑप्शन ट्रेडिंग) , ही त्या प्रकारची ट्रेडिंग आहे , ज्याच्यात तुम्ही एखाद्या STOCK किंव्हा INDEX च्या Option ला Trade (BUY किंव्हा SELL) करता. Option २ प्रकारचे असतात . CALL OPTION आणि PUT OPTION
- एखाद्या STOCK च्या शेअर ची प्राईझ वरती चाललीये हे CALL OPTION (CE) आपल्याला सांगतो . आणि PUT हा OPTION(PE) आपल्याला त्या शेअर ची प्राईझ खाली चालीये हे सांगतो.
Options काय असतात ह्या बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी ही पोस्ट वाचा :- CALL आणि PUT काय आहे आणि ह्यांना कशाप्रकारे Trade करायचंय .
Option Trading याच्यासाठी पॉप्युलर आहे कारण की , याच्यामध्ये तुम्ही खूप कमी पैसे लावून खूप मोठा Profit कमावू शकता. आणि ते सुद्धा काही मिनिटांमधे.
Option Trading मध्ये तुमचे पैसे Seconds आणि Minutes मध्ये वाढतात किंव्हा कमी होतात . म्हणजेच तुम्ही काही मिनिटातच तुमचा पैसे २गुणे , ३गुणे, वाढतात. म्हणून Option Trading लोकांची आवडती ट्रेडिंग बनली आहे .
परंतु लक्षात असुद्या की Option trading मध्ये जितका फायदा आहे , त्याचे काही पट Risk सुद्धा आहे , तरी पण तुम्ही Option Trading शिकू इच्छिता , आणि ह्याला शिकून एक Successfull Option Trader बानू इच्छिता . तर हा Artical तुम्हाला उपयोगी पडेल नक्की वाचा -:
Option Trading कशी शिकायची (संपूर्ण माहिती)
3. कोणत्याही Risk शिवाय पैसे कमवण्यासाठी स्विंग ट्रेडिंग शिका.
वरती सांगितलेल्या दोन्ही ट्रेडिंग शॉर्ट टर्म साठी आहे, जेव्हा की स्विंग ट्रेडिंग एक पोजीशनल ट्रेडिंग आहे , म्हणजेच तुम्ही ह्याला लॉन्ग टर्म साठी होल्ड करू शकता, ह्या प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये तुम्ही एखाद्या शेअर ला काही हफ्त्या पासून काही महिन्यांपर्यंत होल्ड करू शकता.
जर तुम्ही जास्त रिस्क नाही घेऊ शकत तर स्विंग ट्रेडिंग तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगने चांगला प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला Nifty 50 STOCK मधेच Trade करायला हवा.
जर तुम्ही ट्रेडिंग शिकण्यासाठी सुरुवात करत आहेत , तर तुम्हाला ह्या ३ मधून एखाद्या प्रकारच्या ट्रेडिंग वर जास्त कॉन्सन्ट्रेटे करायला हवं.
- Trading चे एकूण किती प्रकार असतात – (सगळ्या पर्यायांची उदाहरणासोबत माहिती)
11) सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर ट्रेडिंग करायला शिका
सपोर्ट आणि रेसिस्टन्सवरच ट्रेडिंग करून बरेचसे लोक दररोज पैसे कमावतात. जर तुम्ही फक्त आणि फक्त सपोर्ट आणि रेसिस्टन्सद्वारे च ट्रेडिंग करायला शिकलात तर , तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही पडणार . पण तुम्हाला ह्यच्यासाठी खूप जास्त मेहनत आणि प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजेच सारखं सारखं Trade घ्यावा लागणार.
कारण खूप वेळा असं होत की शेअर प्राईझ, तुम्ही अंदाज लावलेल्या दिशेला नाही तर , एकदम विरुद्ध दिशेला जायला लागतो . ज्याच्यामुळे तुम्हला प्रॉफिट च्या जागी नुकसान होतो. आत्ता पर्यंत आपण शिकलो की Support Area वर गेल्यानंतर प्राईझ वाढणे सुरु होते, आणि रेसिस्टन्स एरिया वर गेल्यानंतर खाली पडणे चालू होतो.
पण जेव्हा तुम्ही Live Market मध्ये ट्रेडिंग करत आहात, तर तुम्हाला नेहमी असं बघायला नाही भेटणार
काही वेळा असं पण होऊ शकत की प्राईझ Support Level वर पोहचण्याअगोदरच वरच्या दिशेला जाईल, आणि खूप वेळा असं झालं आहे की प्राईझ Resistance Level वर पोहचण्याअगोदरच खालच्या दिशेला जाईला सुरु होईल
म्हणून तुम्ही जेव्हा पण Support आणि Resistance ची Line Draw कराल तर त्याला एका मोठ्या Range मध्ये Draw करा , ज्यामुळे प्राईझ थोडा खाली वर जरी झाला . तर जास्त काही फरक नाही पडणार .
तुम्हाला सांगू इच्छितो की Support आणि resistance वर Ridding करणं, त्यावेळेस जास्त Profitable असत. जेव्हा मार्केट एका Range मध्ये फिरत असेल . म्हणजेच जेव्हा मार्केट ना की वरच्या Side ला ना की खालच्या Side ला . Sideways असत . तेव्हा तुम्ही Support वर खरेदी करून आणि Resistance वर विकून . किव्हा ह्याच्या उलट करून एक चांगलं Proft कमावू शकता.
सपोर्ट आणि रेसिस्टन्सवर Trade करण्याची संपूर्ण माहिती
NEXT STEP 12.
12) टेक्निकल इंडिकेटर्स काय असतात ते शिका .
ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्हाला टेक्निकल इंडिकेटर्स च्या बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. टेक्निकल इंडिकेटर्स ला मराठी भाषेमध्ये तांत्रिक निर्देशक म्हणतात. तर हे टेक्निकल इंडिकेटर्स आपल्याला प्राईझ वाढणार आहे कि कमी होणार आहे याच्याबद्दल आपल्याला अगोदरच माहिती देत . हे इंडिकेटर्स तुम्ही चार्ट वर Apply करू शकता लागू करू शकता. बघितले गेले तर टेक्निकल इंडिकेटर्स चे अंदाज हे मोठ्या प्रमाणात बरोबरच असतात . कारण हे Indicaters Past डेटा ला अनॅलाइझ करून फ्यूचर ची Prediction (अंदाज) देतात.
Technical Indicaters बऱ्याच प्रकारचे असतात. जसे कि :- आर एस आय(RSI) , MACD , बोलरिंग Band , Volume , Moving Average Etc . जर तुम्हाला Technical Indicaters बद्दल अधिक जाणून घेयच असेल तर पुढे दिलेली Post वाचा :-जर तुम्हाला Technical Indicaters बद्दल अधिक जाणून घेयच असेल तर पुढे दिलेली Post वाचा :-
टेक्निकल इंडिकेटर्स काय आहे , आणि ते किती प्रकारचे असतात.
NEXT STEP 13.
13) स्टॉपलॉस आणि टार्गेट काय असतात ते शिका.
या स्टेप मध्ये आपण पाहणार आहोत की, ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्हाला स्टॉपलॉस आणि टार्गेट प्राईझ Design करायला हवं. जर तुम्ही Trading मध्ये स्वतःला नुकसान होण्यापासून वाचवू इच्छिता. तर तुम्हाला शेअर खरेदी करण्यापूर्वी Stop Loss ठरवावे लागतील .
STOP LOSS म्हणजे आपण घेतलेल्या Trade मधून कमी नुकसान घेऊन बाहेर पडण्याची कृती . व सरळ सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर STOP LOSS म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त किती Loss सहन करू शकता तेवढी Amount सेट करणे .
समजा तुम्ही एका Trade वर जास्तीत जास्त 20 रुपयांचा Loss घेऊ शकता. तर Trading करताना तुम्ही 20 रुपये Stop Loss लावायला हवा. असं करण्याने तुम्हाला कधीच 20 रुपयांपेक्षा जास्त नुकसान नाही होणार.
मग शेअर ची प्राईझ किती हि Down झाली तरी तुम्ही Safe असताल .
आता प्रश्न येतो तो Target Prize चा . तर टार्गेट प्राईझ तुम्हाला नेहमी स्टॉपलॉसपेक्षा जास्त ठेवायची आहे . म्हणजेच जर तुमचा Stop loss 20 रुपये आहे तर. Target 30 रुपये 40 रुपये ठेऊ शकता.
अशाप्रकारे जर तुम्ही 10 मधील 5 वेळेस जरी Profit कमावले . तर तुमचा फायदाच झालेला असेल . कारण तुम्ही लावलेला Target Prize हा लावलेल्या Stop Loss पेक्षा जास्त आहे.
स्टॉप लॉस काय आहे . आणि Stop Loss कसे लावतात . (संपूर्ण माहिती)
NEXT STEP 14.
14) ट्रेडिंग चार्ट वर ट्रेण्डलाईन चा उपयोग कसा करायचा ते शिका.
ट्रेडिंग कशी शिकायची याच्यासाठी, Trendline चा उपयोग करता येन गरजेचं आहे . Trendline त्या रेषा असतात ज्या तुम्ही चार्ट वर आखता . ह्या रेषा आढव्या किंव्हा उभ्या असू शकतात. याच्या वेतरिक्त वरच्या side ला तिरकी आणि खालच्या Side ला तिरकी सुद्धा असू शकते.
- Technical Analysis करताना चार्ट वर Trend Line लावणे खुप महत्वाचे आहे. कारण ट्रेंडलाइन ला बघूनच तुम्हला Support आणि Resistance ZONE चा पत्ता लागतो .
- म्हणजेच जर Support आणि Resistance Area ची ट्रेंड लाईन आखली गेली आहे तर , तुम्ही त्याला बघून समजू शकता की, हा Important Zone आहे , आणि इथून प्राईझ Reverse होऊ शकते.
अशाप्रकारे जर बघितलंगेलं तर Trendline तुमच्या कमला फार सोप्पं बनवते आणि Trendline तुम्ही कोणत्याही Stock आणि Index च्या Chart वर ओढू शकता.
ट्रेंडलाईन च्या वेतरिक्त पण खूप सारे असे टूल्स आहेत जे Technical Analysis मध्ये मदत करतात जसे कि :- Technical Indicaters , Volume , Moving Average
NEXT STEP 15.
15) ब्लॉग्स आणि व्हिडिओस बघून ट्रेडिंग कशी करतात ते शिका .
हो तर तुम्ही Trading च्या रिलेटेड Blogs वाचून किंव्हा Youtube वर व्हिडिओस पाहून देखील Online Trading शिकू शकता , जे आता तुम्ही वाचताय ते एक Blog आहे ज्याच्या द्वारे आम्ही तुम्हाला Trading कशी शिकायची याच्याबद्दल Information देतोय. असाच प्रकारे खूप सारे आणखीन Blogs आहेत जे Trading बद्दल माहिती देतात.
जर तुम्हाला Practically Trading शिकायची असेल तर, Trading Related भरपूर असे Youtube चॅनेल्स आहेत जे आपल्याला. Trading चांगल्यापद्धतीने शिकवतात. ते खालील प्रमाणे आहेत :- तुम्ही त्या Channels ला जाऊन Subscribe करू शकता.
YouTube वर खूप सारे असे चांगले Channels आहेत , जे Trading शिकवतात ज्यांची नावे खाली दिलेली आहेत.
- पुष्कर राज ठाकूर (Pushkar Raj Thakur)
- पॉवर ऑफ स्टोकस (Power of Stocks)
- इन्व्हेस्ट आज फॉर कल (Invest Aaj For Kal)
- आयआयटीयन ट्रेडर (IITian Trader)
- आर्ट ऑफ ट्रेडिंग (Art of Trading)
- नीरज जोशी (Neeraj Joshi)
- मुकुल अग्रवाल (Mukul Agrawal)
जर तुम्हाला Online Free मध्ये ट्रेडिंग शिकायची असेल तर तुम्ही वरती दिलेल्या Youtube Channel चे Videos बघू शकता. प्रत्येक चॅनेल ची एक खासियत आहे :-
जर तुम्ही Trading Staring पासून शिकण्यासाठी आतुर आहात तर, पुष्कर राज ठाकूर(Pushkar Raj Thakur) आणि आयआयटीयन ट्रेडर (IITian Trader) हे YoutubeChannel तुमच्या साठी एकदम बेस्ट आहेत
जर तुम्ही Option Trading च्या बद्दल शिकण्यासाठी आलात तर, आर्ट ऑफ ट्रेडिंग Youtube चॅनेल ला Subscribe आणि Follw करा.
जर तुम्ही अगदी सिम्पल Language मध्ये ट्रेडिंग शिकायची असेल तर नीरज जोशी YT चॅनेल ला तुंम्ही Follw करा .
जर तुम्हाला असे व्हिडिओस बघायचे आहेत जे Market Analysis आणि Daily Stock बद्दल माहिती देतात तर तुम्ही , पॉवर ऑफ स्टोकस (Power of Stocks), इन्व्हेस्ट आज फॉर कल (Invest Aaj For Kal), मुकुल अग्रवाल (Mukul Agrawal) हे चॅनेल ना नक्की Follw आणि Subsceibe केलं पाहिजे.
NEXT STEP 16.
16) Share Market Course (शेअर मार्केट कोर्स) करून ऑनलाइन ट्रेडिंग शिका .
Trading शिकण्यासाठी पुढचा टप्पा आहे , Online Course करणे , Internet वर खूप सारे Online Courses
आहेत ज्याच्या द्वारे तुम्ही Basic पासून ते Advance पर्यंत Trading शिकू शकता.
परंतु Online Courses च्या नावाखाली , आजकाल तुमच्या कडून फक्त पैसे उफाळून बनावट कोर्सस विकले जात आहे . म्हणून थोडं सावधान राहा .
याचा अर्थ आस नाही कि सगळे Online Courses खराब आहेत , तर काही चांगले देखील आहेत , फक्त तुम्हाला Course Buy करण्या आगोदर चांगल्या पद्धतीने Enquiry करायची आहे.
NEXT STEP 17.
17) Trading ची पुस्तके वाचून Basics Clear करा .
जर तुम्ही अगदी Systimatic पद्धतीने ट्रेडिंग शिकण्यासाठी इच्छुक असाल तर Trading ची पुस्तके वाचणे एक चांगला प्रकार असू शकतो . जर अगदी नवीन असाल तर आणि आत्ताच ट्रेडिंग ची सुरुवात करत असाल तुम्ही ट्रेडिंग ची चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.
Technical Analysis ची पुस्तके वाचण्यासापासून तुम्ही सुरुवात करू शकता . ज्याला वाचून तुम्हाला हे लक्षात येईल की ट्रेडिंग कशाप्रकारे काम करते, आणि कशाप्रकारे आपण Trading करून पैसे कमावू शकतो.
NEXT STEP 18.
17) Successfull ट्रेडर्सना Follw करा .
trading शिकण्याचा आणखीन एक चांगला पर्याय म्हणजे , Successfull Traders ना Follw करणे , म्हणजेच असे लोक जे पहिल्यापासूनच Trading च्या Field मध्ये वर्षानुवर्षे काम करत आहेत. अशा लोकांना तुम्ही Social Media वर follw करा.
वरती आम्ही तुम्हाला जितके पण Youtube चॅनेल ची नाव सांगितली आहेत , ते सगळे रिअल ट्रेडर आहेत , आणि तुम्ही त्यांना Social Media वर जाऊन Follw कारू शकता. कारण त्यांना मार्केटमध्ये खूप वर्षांपासून Experiance असतो.
जिथे हे सर्व लोक Time to TIme त्याच्या Social Media वर Trading बदल महत्वाची माहिती आणि Updates Provide करतात . याच्या साठी तुम्ही ट्रेडिंग शिकण्यासाठी इच्छुक असाल तर . त्यांना Social media वर जाऊन Follw करा .
तर आपण 18 असे पर्याय बघितले ज्याच्या द्वारे तुम्ही घरी बसल्या Trading शिकू शकता
आता STEP BY STEP बघुयात Online Trading कशी शिकायची ते :-
Online Trading कशी शिकायची ?
Online Trading शिकण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले STEPS FOLLW करावे लागतील.
- Free मध्ये Youtube Videos बघून Online Trading शिका.
- Websites वर ट्रेडिंग चे ब्लॉग्स वाचून ट्रेडिंग शिकू शकता.
- Trading Apps च्या मदतीने ट्रेडिंग शिका .
- Paper Trading करून घरी बसल्या Online Trading शिका.
- Online ट्रेडिंग चे Courses करून शिका.
- Option chain Deta Analysis करून ट्रेडिंग शिकू शकता.
- Technical Analysis ची Practice करून Trading शिकू शकता.
- Chart Pattern Analysis करून Online Trading शिका.
- प्राईझ Action ला समजून Online ट्रेडिंग शिका.
Mobile ने कशी Trading शिकायची.
- Mobile वरून Trading शिकण्याचे पर्याय खालील प्रमाणे आहेत : –
- सगळ्यात आगोदर मोबाईलवरून Demat Account Open करा.
- मग तुमच्या Bank Account वरून Trading Account वर पैसे ट्रान्सफर करा.
- Feature आणि Options मध्ये trade karnyasathi F&O Segment Active करून घ्या.
- आता तुम्ही मोबाईल वरून निफ्टी , बँकनिफ्टी, मध्ये ट्रेडिंग करू शकता. किंव्हा कोणत्याही Stock ला Buy किंव्हा Sell करू शकता.
मित्रांनो मोबाईल वरून ट्रेडिंग करायला थोडं अवघड जाऊ शकत , कारण की Mobile ची Screen खूपच लहान असते. म्हणून Trading Charts ना वागण्यासाठी थोडी प्रॉब्लेम येऊ शकते.
वाचा : – मोबाईल ट्रेडिंग काय आहे आणि ती कशी करायची ?
Trading कुठून शिकावी ?
Trading ची पुस्तके वाचा | online trading course करा |
Trading चे Basics Clear करा | Successfull Traders ला Social Media वर Follw करा. |
Paper Trading करा. | Blogs वाचा |
Youtube वर व्हिडिओस बघा | Technical Analysis ला Step by Step शिका. |
Trading शिकण्यासाठी Best Apps
झिरोधा (Zerodha) | इन्वेस्टपेडिया (Investopedia) |
एन एस ई अकॅडेमि (NSE Acedemy) | द वॉल स्ट्रीट जर्नल (The wall Street Journal) |
मणीकंट्रोल (Moneycontrol) | बिझनेस इन्सिडर(Business Insider) |
ई टी मनी (ET Money) | ब्लूमबर्ग (Bloomberg) |
FAQ ट्रेडिंग कशी शिकायची (मराठीत)
आता पर्यंत आम्ही तुम्हाला Trading शिकण्याच्या संधर्भत खूप काही सांगितलं आहे. परंतु मला माहिती आहे की तरी पण सुरुवातीला Beginners च्या मनात खूप सारे Comman प्रश्न असतात . ज्याची उत्तरे खाली दिलेली गेली आहेत . तर चला असाच बेसिक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. ———–>
Trading शिकण्यासाठी काय करावे.
ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्हाला टेक्निकल रिसर्च , कॅन्डलस्टिक , चार्ट प्याटर्न्स , मोविंग अवरेज , वोल्युम , टेक्निकल इंडिकेटर्स , सपोर्ट आणि रेसिस्टन्स आणि ट्रेन्डलीने च्या बाबतीत शिकावं लागेल .याच्या वेतरिक्त तुम्ही पेपर ट्रेडिंग ची प्रॅक्टिस करून पण Online ट्रेडिंग शिकू शकता.
ट्रेडिंग मध्ये सगळ्यात अगोदर काय शिकले पाहिजे.
ट्रेडिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायला हवी . म्हणजे तुम्ही रिअल मार्केट मध्ये Trade करू शकाल . याच्या वेतरिक्त तुम्हाला ऑप्शन चैन डेटा ला वाचायला येईल हवं . ज्यांने तुम्हाला मार्केट मध्ये प्राईझ एक्शन आणि मोव्हेंटम बद्दल माहिती मिळती.
मी ट्रेडिंग कुठून शिकू शकतो?
ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये, तुम्ही घरबसल्यासुद्धा ट्रेडिंग शिकू शकता . म्हणजेच Online Blogs वाचून आणि Youtube Video बघून तुम्ही ट्रेडिंग शिकू शकता.
आम्ही स्वतःहून ट्रेडिंग शिकू शकतो का ?
हो स्वतःहून ट्रेडिंग शिकली जाऊ शकते . पण यांच्यामध्ये भरपूर वेळ लागू शकतो. पण स्वतःहून शिकण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग च्या बेसिक फुंडमेंटल्सना एक एक करून समजून घ्यावं लागेल. Live Market मध्ये भरपूर वेळा Loss करून घ्यावा लागेल. आणि खूप Experiance घ्यावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग शिकू शकता.
ट्रेडिंग शिकायला किती वेळ लागतो?
तस तर तुम्ही ट्रेडिंग ला काही हफ्त्यामध्ये किंव्हा महिन्यामध्ये शिकू शकता. पण Proper Way ने Trading शिकण्यासाठी 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतचा वेळ लागू शकतो. जर तुम्ही एक सुरुवाती Trader आहेत तर. तरी पण तुम्ही 1 – 2 वर्षा मध्ये ट्रेडिंग करायला शिकू शकता.
मी 1 महिन्यामध्ये ट्रेडिंग शिकू शकतो का?
फक्त 1 महिन्यामध्ये ट्रेडिंग शिकणे थोडं अवघड असू शकत. पण अशक्य नाहीये. ट्रेडिंग शिकण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे Vertual Trading ची Practice करणे . ज्याच्या द्वारे Live Market मध्ये Trade करून Online Trading शिकू शकता.
ट्रेडिंग मध्ये किती लोक Success होतात?
सेबी (SEBI) च्या Report नुसार , भारतात 80% च्या पेक्षा पण जास्त Traders Trading मध्ये Fail होतात. म्हणजेच फक्त 20% लोकच ट्रेडिंग मध्ये Success होतात. असं यासाठी कारण लोक ट्रेडिंग ला एका Business सारखं नाही तर , लवकर पैसे कमवण्याची मशीन च्या रूपात बघतात.
ट्रेडिंग मध्ये लोक Fail का होतात?
ट्रेडिंग मध्ये लोक Fail होण्याचं कारण आहे. knowledge ची कमी. म्हणजेच लोक काहीच न शिकता Trading मध्ये Entry तर करतात . पण त्यांना हे नाही माहिती असत कि Loss ला कशाप्रकारे Manage करायचं . आणि ते लवकरच आपले पूर्ण पैसे गमवून बसतात , जो कि त्यांच्या FaiL होण्याचं Main कारण ठरत .
Trading मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट काय आहे.?
ट्रेडिंग मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण Mindset आहे . जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट ठेवता . तर तुम्ही हे ऐकलंच असेल कि ‘Trading हे 80% माइण्डसेट आहे आणि 20% स्ट्रॅटेजि आहे ’ म्हणजेच Trading Physocology सगळ्यात महत्वपूर्ण Role निभावतो.